७३ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले
मुंबई, दि.१४: वृद्धाच्या घरी दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या चोट्याला अखेर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. विकास सोमा पवार असे त्याचे नाव असून चोरी केल्यानंतर तो शिर्डीला त्याच्या भावोजींच्या घरी गेला होता. त्याच्याकडून दोन लाख १६ हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
बोरवली येथे ज्येष्ठ नागरिक राहतात गेल्या महिन्यात ते बोरवलीच्या दत्तपाडा येथे त्यांच्या मुलीला भेटायला गेले होते. सायंकाळी ज्येष्ठ नागरिक घरी आले तेव्हा घरपोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातून दोन लाख १३ हजारांचा ऐवज चोरी गेल्याप्रकरणी त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. वृद्धाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, नितीन तडाखे, सहाय्यक निरीक्षक ओम तोटावार, उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर आदी पथकाने तपास सुरू केला.
तपासा दरम्यान पोलिसांनी ७३ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेज मध्ये विकास हा रेल्वे नजीकच्या भिंतीवरून चढून येत असल्याचे दिसला. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. विकास लोकलने मालाड येथे उतरला. त्यानंतर तो पायी मालवणी येथे गेल्याचे फुटेज मध्ये उघड झाले.
विकास हा शिर्डीला त्याच्या भावजींकडे गेल्याचे उघड झाले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक शिर्डीला रवाना केले तेथून त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. त्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्याने चोरलेले दागिने वसई येथे एका भंगारवाल्याकडे ठेवायला दिले होते. विकासला अटक करून पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा