ऑनलाईन चीटर्ससाठी बनावट खाती - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

demo-image

ऑनलाईन चीटर्ससाठी बनावट खाती

मुंबई : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सेंटर्सना बनावट बँक खाते उघडून देणाऱ्या दोघा आरोपींच्या सायबर पोलिसांच्या मध्य विभागाने गुरुवारी मुसक्या आवळल्या. अजहर अन्सारी (वय, २१) आणि राजकुमार पांडे (वय,२७) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते अँटॉप हिलचे राहणारे आहेत.

.com/img/a/


वरळीत राहणाऱ्या एका महिलेने मॅट्रीमोनी वेबसाइटवर तिचे नाव नोंदणी केली होती. तिच्याशी तीस वर्षाचा तरुणाने संपर्क करत मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केल्यावर एक दिवस मी दिल्ली विमानतळावर पोहोचलो आहे. मात्र, माझ्याकडे २ हजार डॉलर असल्याने पोलिसांनी मला पकडले आहे. त्यामुळे पैसे सोडवायला पैशांची गरज आहे, असे सांगत जवळपास ४४ लाख ९३ हजार रुपये बँक खात्यात पाठवण्यास सांगत तिच्याकडून पैसे उकळले.


त्यानुसार,  सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडितेने पैसे पाठवलेल्या बँक खात्याची चौकशी केली, जे बनावट असल्याचे उघड झाले. ही खाती अटक आरोपी चिटर्सना पुरवत असल्याचे समजले. त्यानुसार अन्सारी याला पुरला तर पांडेला अँटॉप हिल परिसरातून अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून ४३ पॅन व आधार कार्ड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले आधार कार्ड हस्त गत करण्यात आले.










.com/img/a/

.com/img/a/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *