मुंबई : मुंबईतल्या एटीएम सेंटरमध्ये कार्ड स्किमर बसवून लोकांच्या डेबिट, क्रेडिट,कार्डची माहिती चोरायची. मग त्या माहितीच्या आधारे बनावट कार्ड बनवून पैसे काढायचे. लाखो रुपये जमले कि बल्गेरियाला पळ काढणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
बँक ऑफ इंडियाच्या मुलुंड पूर्व येथील शाखेतील खातेदारांचे पैसे अचानक काढले जाण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट - ७ च्या पथकाने तपास सुरु केला. गोरेगाव पोलीस ठाण्यातदेखील अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर, निरीक्षक सुधीर जाधव व पथकाने आरोपीचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर नागरिकांच्या खात्यातील एटीएममधून पैसे काढणारा बल्गेरियाचा चोर सेरगिव्ह डॅन चोव्ह याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ८,५०० युरो, १४,५३० हजारांची रोकड, लॅपटॉप, बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्ड, Deep Insert Skimmer जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा