रिक्षा पार्किंग वरून पोलिसाला मारहाण - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

demo-image

रिक्षा पार्किंग वरून पोलिसाला मारहाण

रिक्षा चालकाला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : रिक्षा पार्किंग वरून रिक्षाचालकाने एका पोलीस शिपायाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना धारावी परिसरात घडली. मारहाण करून शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मोहम्मद नदीम मोहम्मद वसीम शेख (वय २९) या रिक्षाचालकाला धारावी पोलिसांनी अटक केली. त्याला वांद्रे न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिवा येथे राहणारे संदेश प्रेम सिंह राठोड हे सध्या नायगाव येथील विशेष शाखेतील दंगल नियंत्रण कक्षात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. नवरात्र उत्सव असल्याने त्यांना धारावीत बंदोबस्तासाठी तैनात केले होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे बंदोबस्तासाठी धारावीतील संत रोहिदास मार्ग, अशोक मिल नाका परिसरात आले होते. तिथे ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून खबरदारी घेत होते. तिथे मोहम्मद नदीम त्याची रिक्षा घेऊन आला. त्याने वाहतुकीस अडथळा होत असताना त्याची रिक्षा तिथेच पार्क केली होती. यावेळी संदेश राठोड यांनी त्याला त्याची रिक्षा तिथे पार करू नकोस असे सांगितले, त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी त्याने पोलीस संदेश यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *