वागळे युनिट पाचने ठोकल्या चौकडीला बेड्या
दादासाहेब येंधे : चारचाकी गाडी, दहा मोबाईल फोन, लाखभर रोकड असा ऐवज गर्दीत खिसे कापणाऱ्या पाकिटमारांकडे सापडल्याने त्यांना अटक करणाऱ्या पोलिसांचेही डोळे वटारले आहेत. गुन्हे शाखेच्या वागळे युनिट पाचने या चौकडीला अटक केली असून त्यांच्यावर राज्यात विविध पोलीस ठाण्यांत भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ठाणे शहरातील गर्दीची ठिकाणे हेरून हातसफाई करणाऱ्या टोळीतील आरोपींची माहिती वागळे युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे, उपनिरीक्षक चव्हाण, तावडे, सुनील अहिरे, जाधव, गोऱ्हे, शिंदे, शिवाजी रायसिंग, फराटे, गायकवाड, मनोज पवार, अजित शिंदे, रघुनाथ गार्डे, सागर सुरळकर, यादव, सुजाता शेलार, मोहन भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांना शिळफाटा येथील दहिसर मोरी परिसरातून अटक केली.अबूबकर अन्सारी, नदीत अन्सारी, अतिक अन्सारी, अशपाक अन्सारी अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून एक लाख १९ हजार रोकड, दहा मोबाईल फोन, चारचाकी गाडी, खिसे कापायचे कटर जप्त करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा