Ticker

6/recent/ticker-posts

परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणाऱ्या भामट्याला अटक

१७ तरुणांना ६७ लाखांना फसवले

मुंबई, (दादासाहेब येंधे) : नोकरीच्या बहनाने फसवणूक करणाऱ्या मोहम्मद शफिक मोहम्मद हनीफ खान या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे . चार राज्यांतील सतराहून अधिक तरुणांची मोहम्मद शफिकने जवळजवळ ६७ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. नोकरीचे बोगस ऑफर लेटर, विसा व विमान तिकीट देऊन तो त्याचे कार्यालय बंद करून तेथून पळून जात होता. स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.


मोहम्मद शफीक हा ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील रहिवासी आहे. त्याने अनेकांना विदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने स्वतःची एस के एंटरप्राईजेस मॅन पॉवर जॉब कन्सल्टन्सी नावाचे कंपनी देखील सुरू केली होती. भाड्याने ऑफिस उघडून त्याने अनेकांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले होते. काही महिन्यापूर्वी त्यांनी सात बेरोजगार तरुणांकडून ३६ लाख रुपये घेऊन त्यांना बोगस नोकरीची ऑफर लेटर विजा आणि विमान तिकीट दिले होते आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्यानंतर या तरुणांना त्यांच्याकडील विजा, तिकीट आणि ऑफर लोटर बोगस असल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी मोहम्मद शफिक विरुद्ध अग्रीपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीचा आग्रीपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला. ही शोध मोहीम सुरू असतानाच युनिट दोनच्या पथकाने पळून गेलेल्या मोहम्मद शफीकला अटक केली.


तपासात मोहम्मद शफीकने मुंबईसह हरियाणा, गुजरात, पंजाब, कोलकाता या चार राज्यांतील १७ बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आत्तापर्यंत ६७ लाख रुपये उकळण्याचे तपासात उघडकीस आले आहे. या सर्व तरुणांना बोगस नियुक्तीची ऑफर लेटर, विजा व तिकीट देऊन तो पळून गेला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या