Ticker

6/recent/ticker-posts

आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

मुंबई (दादासाहेब येंधे) : लैगिंक संबंधानंतर एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी चंद्रपाल रामखिलाडी ऊर्फ नेता नावाच्या एका आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपाल हा उत्तरप्रदेशच्या आग्राचा रहिवाशी असून त्याने लैंगिक संबंधावेळी झालेल्या वादानंतर महिलेची हत्या करून घटनास्थळाहून पळ काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबरला मालाड, मालवणी, मार्वे रोडवरील सावंत कंपाऊंडजवळ मालवणी पोलिसांना एका ४६ वर्षीय सेक्स वर्कर महिलेचा मृतदेह सापडला असल्याची तक्रार गाडी नंबर ५ ला मेसेज मिळाला होता. तपासाअंती या महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचारासह हत्येचा गुन्हा नोंदवला. तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. 


आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथक उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशासह इतर राज्यात गेली होती. याच दरम्यान उत्तरप्रदेशात गेलेल्या पथकाने चंद्रपाल ऊर्फ नेता यास संशयावरून ताब्यात घेतले. मात्र चौकशीत त्यानेच या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला सोमवार ६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


मृत महिला ही सेक्स वर्कर असून ती कांदिवलीतील चारकोप परिसरात तिच्या आई, भाऊ आणि मुलीसोबत राहत होती. गुन्ह्याची दिवशी ती मार्वे रोडवर उभी होती. मात्र, त्यांच्यात वाद झाला आणि याच वादानंतर दारुच्या नशेत असलेल्या चंद्रपालने तिची गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर प्रचंड घाबरलेल्या चंद्रपालने तिथून पळ काढला. तो रिक्षाचालक असल्याचे पोलिसांना समजले. मात्र, पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षाचा शोध घेतला आणि त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या