Ticker

6/recent/ticker-posts

जोगेश्वरी पोलीसांकडून बतावणी करून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

 चौकशीत आणखी सहा गुन्हे उघडकीस

मुंबई, दि.२७ : जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बतावणी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३.४० लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईत आरोपींकडून इतर सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

१६ सप्टेंबर रोजी ७० वर्षीय किस्तुरा चौधरी यांना जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसरात बोलण्यात गुंतवून त्यांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या त्यांच्या पाकिटात ठेवण्यास सांगून त्या चोरून घेतल्या होत्या. सीसीटीव्ही तपासणी व गुप्त माहितीच्या आधारे पुणे आणि मुंढवा परिसरातून रमेश विजयकुमार जैस्वाल (वय, ४६) व निलेश चंद्रकांत घाग (वय, ३३) यांना अटक करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेश जैस्वाल याच्याविरोधात मुंबई, ठाणे व मिरा-भाईंदर परिसरात तब्बल ८१ गुन्हे दाखल असून, निलेश घागवर पाच गुन्हे नोंद आहेत. वाकोला, बोरीवली, कल्याण व डोंबिवलीसह सहा गुन्ह्यांतील दागिने व पुरावे या आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या