Ticker

6/recent/ticker-posts

मालाडमध्ये मालमत्तेच्या वादातून गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे)  : मालाडमध्ये गावठी कट्ट्यातून गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा-१२ च्या पथकाने नुकतीच नवी दिल्ली येथून अटक केली. निहाज उर्फ गुड्डू शेख असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कुरार येथील संजय नगर परिसरात रविवारी पहाटे गोळीबाराची घटना घडली होती. अबीतुल्लाह उर्फ तुला बेग (५८) आरोपी निहाद उर्फ गुड्डू शेख सोबत नशापान करीत बसला होता. रविवारी पहाटे साडेचारच्या वाजता त्यांच्यात मालमत्तेवरून जोरदार भांडण झाले. काही वेळानंतर दारूच्या नशेत आरोपी नियाज शेखने खिशातून देशी रिव्हॉल्व्हर कट्टा काढला आणि तुला बेगवर तीन गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने बेग खाली कोसळला. एक गोळी तुलाच्या मानेत कानाजवळ लागली होती. याप्रकरणी आरोपी विरोधात कुरार पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम १०९, तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३७ (१) (अ) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा-१२ च्या पथकाकडून सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी निहाज शेखला नवी दिल्ली येथून अटक केली. 


आरोपीला पुढील तपासासाठी कुरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मालमत्तेचा वाद हे या हल्ल्यामागील प्राथमिक कारण असले तरी हा वाद नेमका काय होता याबाबत कुरार पोलीस अधिक तपास करीत आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या