मुंबई, (दादासाहेब येंधे) : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून, रविवारी (ता. १२) मराठवाड्यातील माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप केले जाणार आहे.
यामध्ये सर्व इयत्तेची (इयत्ता १ ली ते १२ वी) सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेन्सिल सेट आणि शाळेची-कॉलेजची बॅग या वस्तूंचा समावेश असलेल्या किटचे सरासरी हजारो विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. ही मदत ट्रकद्वारे शनिवारी (ता. ११) सकाळी ११:३० वाजता लालबाग मार्केट, लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ येथून मराठवाड्यासाठी पाठवली जाणार आहे.
0 टिप्पण्या