Ticker

6/recent/ticker-posts

शेअर मार्केटमध्ये अवैध ट्रेडिंग करणाऱ्या तीन जणांना अटक

मुंबई, दि. ११ : शेअर मध्ये अवैध ट्रेडिंग करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी विरल प्रवीण पारेख, सोहनलाल बनवावेलाल कुमावत आणि जिगर प्रकाश संघवी या तिघांना कांदवली गुन्हे शाखेच्या युनिट-११ च्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली आहे. यातील विरल पारेख शेअर ब्रोकर मुख्य आरोपी आहे.

याच गुन्ह्यात तिन्ही आरोपींना किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कांदिवली परिसरात काही जण शेअर मार्केटमध्ये अवैध ट्रेडिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. युनिट-११ च्या अधिकाऱ्यांनी कांदिवलीतील सुभाष लेन, भगत कॉलनीच्या द्वारकेश सहकारी सोसायटीत छापा टाकला. तिथे विरेल बारीक सोहनलाल कुमावत आणि जिगर संघवी या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील विरल आणि जिगर हे दोघे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे दिसून आले. तपासात सोहनलाल व जिगर हा विरल पारेख याच्या सांगण्यावरून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे समजले. तपासात विरलला त्याचा मित्र जॅक उर्फ राजू याने संबंधित वेबसाईटचे सबस्क्रीप्शन दिले होते. या वेबसाईटच्या माध्यमातून सोहनलाल कुमावत आणि जिगर संघवी हे अवैधरित्या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होते. त्यांनी आतापर्यंत बारा जणांचे पैसे शेअर मध्ये गुंतवले होते. दर आठवड्याला ते सर्वजण विरलला शेअर ट्रेडिंगसाठी पैसे आणून देत होते. या ट्रेडिंगवर विरल जॅकला कमिशन देत होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या