मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबईच्या परेल परिसरातील ए जलिचंद ज्वेलर्स शॉप या नामांकित सोन्याच्या दुकानातून तब्बल ४ कोटी ७ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एका विश्वासू कामगारानेच लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ८ सप्टेंबरच्या दुपारपासून ९ सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच्या दरम्यान, कामगार जितु नवाराम चौधरी (वय २३) हा दुकानातील सोन्याचे दागिने आणि रोकड लबाडीच्या इराद्याने चोरून फरार झाला होता.
भोईवाडा पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेत राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील, बाली तालुक्यातील सादडा गावात सापळा रचला. पोलीस पथकाने पाहिजे आरोपी जितु चौधरीसह त्याचे दोन साथीदार कमलेश वाघाराम चौधरी (२६) आणि भरतकुमार ओटाराम चौधरी (३८) यांच्या मुसक्या आवळल्या.
आरोपींकडून आतापर्यंत ७० टक्के चोरीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित सोन्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

0 टिप्पण्या