व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना अटक

दोघेजण गुन्हे शाखा कक्ष-७ कडून जेरबंद

मुंबई, दादासाहेब येंधे : ०८ सप्टेंबर २०२१ रोजी प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून दोन व्यक्ती वाईल्ड लाईफ अँक्ट मधील तरतुदीनुसार संरक्षित प्राणी स्पर्म व्हेल माश्याची उलटी ज्यावर खरेदी/विक्रीवर शासनाने बंदी आणलेली आहे, ती बेकायदेशीररित्या विकण्याकरीता भांडुप, कांजुरमार्ग परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

प्राप्त बातमीच्या अनुषंगाने दिनांक ०८/०९/२०२१ रोजी कक्ष-७ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वन विभागाचे अधिकारी व पंचासह कांजुरमार्ग ते भांडुप सर्व्हिस रोड, भांडुप पुर्व, मुंबई या ठिकाणी एकमेकांना सहजरित्या पाहू शकतील असे सापळा लावून विखरुन उभे राहिले. काही वेळाने खबरीतील वर्णनाशी मिळते जुळेते वर्णन असलेले दोन पुरुष हे घटनास्थळी येवून थांबले. सदर दोन्ही पुरुषांच्या हालचालींवर आम्ही सर्वांनी लक्ष ठेवून पाहिले असता, ते इकडे तिकडे पहात होते. त्यांच्या हालचाली हया संशयास्पद वाटत होत्या. त्यावरून नमुद दोन्ही इसम हे खबरीतील इसम असल्याचे खात्री झाल्याने त्यांना चोहोबाजूने घेराव घालून पोलीस पथकाने योग्य त्या बळाचा वापर करुन जागीच थांबविले. त्यानंतर आरोपी क. १ याचेकडील काळया रंगाच्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये एका पारदर्शक प्लॅस्टिक पिशवीमध्ये ब्राऊनिश रंगाचा पदार्थाचा दगडाच्या आकाराचे ५ किलो ९१० ग्रॅम वजनाचे लहान मोठे तुकडे, किंमत अंदाजे रु. ५,९१,००,०००/- मिळून आले. पथकातील वन अधिकारी यांनी नमुद पदार्थाच्या एका छोटया तुकडयाचे परिक्षण केले असता नमुद पदार्थ हा व्हेल माश्याची उलटी असल्याचे त्यांनी सांगीतले. सदर इसमांविरूध्द पथकातील पोलीस अंमलदार यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कांजूरमार्ग पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपासाकरीता या कक्षाकडे घेण्यात आला आहे.

अटक आरोपी :-

१) एक पुरूष आरोपी, वय ३७ वर्षे, रा.ठी. गोशाला रोड, मुलुंड, मुंबई.

२) एक पुरूष आरोपी, वय २६ वर्षे, रा.ठी. झारखंड चाळ, मालाड (प), मुंबई.

 सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्‍त(गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुकक्त(गुन्हे) श्री. विरेश प्रभु, पोलीस उप-आयुकक्त (प्रकटीकरण-१) श्री. दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) श्री. नितीन अलकनुरे, प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मनिष श्रीधनकर यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बागडे, अमोगसिद्ध ओलेकर, महिला सहा. पोलीस निरीक्षक सुनयना सोनावणे, पोलीस उप निरीक्षक माधवानंद धोत्रे, निलेश चव्हाण, स्वप्निल काळे, नामदेव परबळकर, पोलीस हवालदार दिपक पवार, सुभाष मोरे, शशिकांत कांबळे, पोलीस नाईक गिरीश जोशी, विशाल शिंदे, पोलीस शिपाई जितेंद्र पाटील, महेश सावंत, पोलीस नाईक चालक राजाराम कदम, पोलीस शिपाई चालक चरणसिंग गुसिंगे यांचेसह वन अधिकारी यांनी पार पाडली. प्रेसनोटद्वारे असे कळविण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज