महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मान्सूनच्या तयारीच्या कामांचा आढावा घेतला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, १३ मे, २०२१

महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मान्सूनच्या तयारीच्या कामांचा आढावा घेतला

मध्य रेल्वेने पावसाळ्यासंदर्भातील केली तयारी


मुंबई : श्री आलोक कंसल यांनी नुकतीच आभासी बैठकीद्वारे मुंबई विभागातील मान्सूनच्या तयारीच्या कामांचा आढावा घेतला.  ‘नवीन आर.सी.सी. बॉक्स टाकून विद्यमान पुलाच्या जलवाहिनीच्या वाढीसंदर्भात पाण्याचा प्रवेश रोखण्या-या  जोडांची व्यवस्था करण्यासाठी ड्रॉइंगची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी मुंबई विभागातील अधिका-यांना दिले.  तसेच कटिंग्ज, बोगदे, पाण्याचे नाले आणि पावसाळ्यासंदर्भातील इतर बाबींच्या तपासणीसंदर्भात अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. 

 घाट विभाग

श्री आलोक कंसल यांनी रेल्वे बोर्डात असताना २०१९ मध्ये घाटांची पाहणी केली असताना त्यांनी घाटातील असुरक्षित ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना सुचवल्या.  यामध्ये दक्षिण-पूर्व घाटातील पठाराला कायम ठेवण्यासाठी काही ठिकाणी कॅनेडियन कुंपण घालणे, वायर नेट व स्टील बीममधून पडणा-या दगडाला रोखणे,  रुळांवर जास्त पाणी येऊ नये यासाठी नाल्याची भिंत उंचावणे इ. कामे सुरू आहेत.  तसेच बोगद्याच्या अखंड भागासाठी बोगद्याच्या स्टील कमानीच्या पट्ट्यांवरील कॉंक्रीटच्या भिंतीवर आधारलेल्या भागाचे इपोक्सी ग्राउटिंग आणि कमानीच्या भिंतींवर आधार देण्याचे नियोजित असून लवकरच काम सुरू होईल.  जिओ कंपोझिट स्टील ग्रीड / जाळी व इतर संरक्षक कार्य यांच्या सुरक्षित ड्रापरीसह डायनॅमिक रॉक फॉल अडथळ्यांची तरतूद प्रगतीपथावर आहे.

दक्षिण-पूर्व घाटः  अंदाजे ५८ बोगद्यांसह सुमारे २८ कि.मी. लांबीचा आहे.   

ईशान्य घाटः  अंदाजे १८ बोगद्यांसह  सुमारे १४ कि.मी. लांबीचा आहे.  घाटात पोकलेन मशीन असलेली डीबीकेएम (फ्लॅट वॅगन्स) वॅगन कचरा/चिखल, ड्रेनेज साफ करण्यासाठी आणि स्टँडबाय व्यवस्था म्हणून ठेवली जात आहे.  आतापर्यंत हिल गँगच्या मदतीने ८०० सैलसर दगडे पाडण्यात आले आहेत.  पावसाळ्याच्या आगमनापूर्वी बोल्डर स्पेशल ट्रेन आणि तत्सम सोडण्याची योजना आहे.  

 नाल्यांची रुंदी वाढवणे 

कुर्ला ते विद्याविहार दरम्यान सूक्ष्म बोगद्याद्वारे १.८ मीटर व्यास आणि दोनशे मीटर लांबीचे पाच पाईप्स टाकले गेले आहेत.  पनवेल आणि कर्जत, वडाळा आणि रावळी, टिळक नगर, बदलापूर आणि वांगणी दरम्यान विद्यमान पुलाला लागून आरसीसी बॉक्स टाकून जलमार्ग वाढविण्यात आला आहे.  राज्य शासनाच्या मदतीने मायक्रो-टनेलिंगद्वारे सँडहर्स्ट रोड येथे १.८ मीटर व्यास आणि ४०० मीटर लांबीचा पाईप, मस्जीद स्थानक येथे १ मीटर व्यास आणि  ७० मीटर लांबीच्या पाईपला सूक्ष्म बोगद्याद्वारे जमिनीखालून टाकण्यात आलेले.  

चिन्हांकित ठिकाणी पंपांची संख्या आणि क्षमता वाढविण्यात आली आहे. 

मोठ्या पाण्याचा प्रवाह त्वरित वाहून नेण्यासाठी, पावसाळ्याच्या काळात ट्रॅकवर पाणी राहू नये आणि  रेल्वेची वाहतुक विस्कळीत होऊ नये, यासाठी हेवी ड्युटी पंप देण्याचीही रेल्वेने योजना आखली आहे.  मागील वर्षाच्या तुलनेत पंपांची संख्या १०% वाढविली जाईल.  

 सिग्नल आणि दूरसंचार

पूर प्रवण क्षेत्रात जलरोधक मोटर्स देण्यात आल्या आहेत.  टर्मिनल ब्लॉक्सचे वॉटर प्रूफिंग, कम्युटेटर चेंबर, गीअर बॉक्स आणि कॉइल ड्रमचे सीलिंग आणि गीअर बॉक्स असेंब्लीमध्ये बदल करणे इ. कामे मे २०२१  पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत.  

 ट्रॅक्शन वितरण 

 पॉवर ब्लॉक परिचालनाद्वारे गाड्यांच्या सुलभ ऑपरेशनसाठी क्रॉसओव्हर, टर्नआउट्स, मास्ट्स, कॅन्टिलवर्स इत्यादींची देखभाल सुनिश्चित करण्यात आली आहे.
ट्रेनच्या सुलभ संचालनाकरिता ओएचई (ओव्हर हेड ईक्विपमेंट)  गीअर्सचे देखभाल सुनिश्चित करण्यासाठी टॉवर वॅगन व फूट पेट्रोलिंगद्वारे विभागांची लाइव्ह लाईन चेकिंग केली जात आहे.  संपूर्ण मुंबई विभागात आरओबी/ एफओबी खालील अत्यवस्थ भागाची तपासणी व रस्टी पोर्टलची  तपासणी करून  बदलण्याची कामे सुरू आहेत.  

 इलेक्ट्रिकल जनरल 

स्टँडबाय सप्लाय डीजी सेटची तपासणी, एएमएफ पॅनेल व आपत्कालीन सर्किटचे कामकाज, विद्युत मालमत्ता, आउटडोअर पॅनेल्स, ओव्हरहेड लाईन्सच्या आसपासच्या झाडाच्या फांद्या छाटणे, केबल व बस बार कनेक्शनची तपासणी तापमान गनद्वारे करणे आणि गरम ब्लोअरने साफ करणे तसेच मुंबई विभागातील विविध ठिकाणच्या पंपांच्या देखभाल व ब्रेकडाउनकडे लक्ष ठेवले जात आहे.  

 सुरक्षा

रेल्वे सुरक्षा दलाच्या क्विक रिएक्शन टीम आणि फ्लड रेस्क्यू टीमने एनडीआरएफकडून प्रशिक्षण घेतले आले.  कोणत्याही परिस्थितीतील बचावासाठी ५  यांत्रिकीकृत बचाव नौका सामरिकरित्या ठेवण्यात आल्या आहेत.  नियंत्रण कक्षाला वेळेवर माहिती मिळण्यासाठी  आरपीएफ कर्मचार्‍यांकडून ड्रोनद्वारे मॉनिटरिंग करण्यात येईल. 

 समन्वय सभा

याशिवाय बृहन्मुंबई महानगर पालिका अधिका-यांसमवेत समन्वय बैठका होत आहेत.  यंदाच्या पावसाळ्याच्या तयारीचा भाग म्हणून मध्य रेल्वेने अनेक नवीन उपक्रम राबविले आहेत.  

मक स्पेशल ट्रेन चालवून ट्रॅकसाईडवरून १.५ लाख घनमीटर घाण काढली गेली आहे, २२५ किमी लांबीचे नाले साफ केले आहेत आणि १०० किमी ट्रॅक उंचावण्याची  (raising) योजना यावर्षी नियोजित आहे.  कामे प्रगतीपथावर असून नियोजित वेळेत पूर्ण करण्यात येतील.

नियंत्रण कार्यालय २४ X  ७ कार्यरत आहे आणि राज्य / केंद्र सरकारच्या विविध एजन्सींशी आत्यंतिक सहकार्य ठेवत आहे.

 पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या इतर विभागांना पावसाळ्यासंदर्भातील कामे वेगवान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


































दिनांक: १२ मे २०२१ 
प्रप क्र. 2021/05/20 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज