मुंबई, (दादासाहेब येंधे) : अवैध पद्धतीने निकोटिनयुक्त फ्लेवर्सचा पुरवठा करणाऱ्या हुक्का पार्लरवर मुंबई गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. मुंबईतील उमरखाडी येथे एका गोदामावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ३ कोटींपेक्षा अधिक किंमतीचा मोठा साठा जप्त केला.
उमरखाडी येथील गोदामात हा साठा ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकला. तेथे सचिन सुशीलकुमार सुरी (वय, ४९) याने हुक्का फ्लेवर्सचा साठा करून ठेवलेला आढळला. हे उत्पादन अल बखर परदेशी कंपनीचे असून, ते एसक्यूब एजन्सीने आयात केले. ही एजन्सी मुंबई महानगर प्रदेशातील हुक्का पार्लरना हे फ्लेवर मागणीप्रमाणे अवैधरीत्या विकते आहे, अशी नेमकी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१ चे प्रभारी निरीक्षक अजय कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने मंगळवारी छापा टाकून कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही पॅकेटवर संविधानिक इशारा नव्हता. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ![]()

0 टिप्पण्या