Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक जाणीवेची एक आगळी वेगळी दिवाळी

चला, त्यांच्याही आयुष्यात एक दिवा पेटवूया

मुंबई, दि. १९ :  मुंबईतील सामाजिक क्षेत्रात अग्रगन्य असणाऱ्या जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने याही वर्षी संस्थापक श्री. सत्यवान नर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकी येथील मम्माबाई हायस्कुल हॉल येथे कर्करोगग्रस्त मुलांसोबत "सामाजिक जाणीवांची एक आगळी वेगळी दिवाळी पहाट " साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कॅन्सरग्रस्त मुलांसाठी जादूचे प्रयोग व मुलांसाठी विविध खेळ खेळून हा कार्यक्रम पार पडला. तसेच त्या नंतर मुलांसाठी आकर्षक भेट वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. 

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री. शरद उघडे, के. ई. एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगिता रावत, नायर रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पाटील, मुंबईतील प्रसिद्ध वास्तूविशारद श्री. उमेश पवार, भाजपा प्रवक्ते श्री. अवधूत वाघ, अध्यक्ष गणेश पार्टे, सरचिटणीस प्रशांत पवार, खजिनदार नागेश तांदळेकर, संयोजक केशव परब, संयोजक विनायक येंधे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ वसई आणि चिंतामणी दातांचा दवाखाना (विरार) यांच्या संयुक्त विद्यमाने व  डॉ. महेंद्रसिंग चव्हाण, डॉ. राजेंद्रसिंग चव्हाण यांच्या सौजन्याने व संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी, दंत चिकित्सा शिबीर व वैद्यकीय मार्गदर्शन शिबिर पार पडले. सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन ट्रस्टचे मार्गदर्शक सुभाषचंद्र (भाई) मयेकर यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांनी दिवाळी पहाट ही अश्या एका अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात येते त्याबद्दल कौतुक करत भविष्यात जीवन प्रबोधिनी ट्रस्टला सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले. 

कार्यक्रमा दरम्यान बोलताना श्री. सत्यवान नर म्हणाले की,  आपण आपले कुटुंब नातेवाईक मित्रांबरोबर नेहमीच रमतो. पण कर्करोगसारख्या आजाराशी लढणाऱ्या मुलांच्या आयुष्यात असे क्षण क्वचितच येत असतिल. अनाथ मुलांना सहानभुती व  आधाराची गरज असते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देण लागतो ह्या भावनेने अनाथ मुलांच्या आयुष्यात श्री. सत्यवान नर व त्यांची जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या माध्यमातून दिवाळी निमित्ताने का होईना दोन क्षण सुखाचे देण्याचा करत असलेला प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे असे बोलून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रमास ट्रस्टचे मार्गदर्शक मेघनाथ शेट्टी, किशोर पटेल, राजू साळवी, नरेंद्र पांगे, बंड्या सावंत, अनिल घाडीगांवकर, सुनिल घाडीगांवकर, लक्ष्मण (बावा) देवरुखकर, श्याम आचरेकर, बाबू पवार, तसेच पदाधिकारी हेमंत मकवाना, अमित पवार, गणेश क्षीरसागर, राजू राणे, प्रदिप (बंटी) शिर्के, नंदकुमार चिबडे, सिद्धेश साळवी, रविंद्र जाधव, बाजीराव तुपे, भाऊसाहेब शिंदे, सिद्धांत परब, संतोष हरपळे, दत्तात्रय माने, शुभम , संतोष सकपाळ, शंकर साळवी, गणेश पाथरे, उमेश गुरव, सिद्धेश आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या