मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे छापा टाकून एम.डी ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा टाकून १३ कोटी ४४ लाख ५३ हजार ७०० रुपये किंमतीचा माल हस्तगत केला असून पाच जणांना अटक केली आहे.
या चौघांच्या चौकशीत नालासोपारा येथे एक एमडी ड्रग्जचा कारखाना असून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज बनविले जातात अशी माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, एसीपी आबूराव सोनावणे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा कुलकर्णी यांच्या पथकातील एपीआय मैत्रानंद खंदारे, विलास पवार, उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, सुशांत साळवी, अजय गोल्हर, पोलीस अंमलदार राणे, आखाडे, भिलारे, सावंत, उपाध्याय, दिवटे, पुंजारी, केदार, भिसे, झिणे, राऊत, सानप, नागरगोजे, काटकर आदींनी नालासोपारा येथील पेल्हार, भावखळ, खैरपाडाच्या रशीद कंपाऊडमधील एमडी ड्रग्ज कारखान्यात छापा टाकला.
यावेळी तिथे एमडी ड्रग्ज उत्पादन करणाऱ्या अन्य एका आरोपीस पोलिसांनी अटक केली. या कारखान्यातून पोलिसांनी ६ किलो ६७५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा १३ कोटी ३८ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणारे चार तर उत्पादन करणारा एक अशा पाच जणांना अटक केली.![]()

0 टिप्पण्या