Ticker

6/recent/ticker-posts

गुटख्याची तस्करी पोलिसांनी रोखली

मुंबई, दि. १३ : मुंबई पोलिसांनी गुटखा तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर गुटख्याने भरलेला एक ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत चौदा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-६ च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, मुंबईबाहेरून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात आहे. माहितीच्या अनुषंगाने, प्रभारी पोलिस निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ताबडतोब सापळा रचला. त्यांनी घाटकोपर येथे हा संशयित ट्रक अडवला.

ट्रकाची तपासणी केली असता, त्यात गुटख्याच्या ११५ गोण्या लपवून ठेवलेल्या आढळून आल्या. या जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सुमारे चौदा लाख रुपये आहे. पोलिसांनी मोहम्मद फिरोजमा शेख, फैजान नसीम अन्सारी आणि नवाज मेहंदी अन्सारी या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुटख्यासोबतच तीन मोबाइल फोन, रोख रक्कम आणि तस्करीसाठी वापरलेला ट्रकही जप्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या