Ticker

6/recent/ticker-posts

घरगुती वादातून १४ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या बापाला अटक

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) येथील कलिना परिसरातील शिवनगर चाळीत, जुन्या सीएसटी रोडजवळ रात्री घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षीय मुलीची हत्या केली, तसेच पत्नीवर जीवघेणा हल्ला केला.



पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद सुलेमान कुजरा याने रागाच्या भरात दोघांवर वार केले. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी नसीमा सुलेमान कुजरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.

या संपूर्ण प्रकरणी मुंबईतील वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेच्या पथकानेही तपास सुरू केला. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या कौटुंबिक वादात १४ वर्षीय मुलीची हत्या आणि पत्नीवर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी मोहम्मद सुलेमान रज्जाक कुजरा (३८) याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर पळून जाऊन लपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्याला अटक केली.

मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली युनिट ९ आणि १० च्या अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. आरोपीने त्याचा मोबाईल बंद केल्यामुळे, त्याच्या मूळ गाव गाठून पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपासासाठी वाकोला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या