Ticker

6/recent/ticker-posts

पॅकर्स अँड मूव्हर्सचे कर्मचारी असल्याचे बतावणी करून घर चोरी

मुंबई, दि. २१ : पॅकर्स अँड मूव्हर्सचे कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून सोन्यांच्या दागिन्यांसह सामानाची चोरी करणाऱ्या संदीप दिनेश विश्वकर्मा, प्रवीण फुलचंद पांडे, दुर्गेश दिवाकांत मिश्रा, राकेश बळीराम यादव आणि पिंटू बबन सिंग या पाच जणांना सायन तसेच काळाचौकी पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतीच अटक केली आहे.


यामधील दोन्ही गुन्ह्यातील बहुतांश चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. सायन येथे राहणाऱ्या महिलेला तिच्या घरातील सामान दुसरीकडे न्यायचे होते. त्यासाठी तिने पॅकर्स अँड मूव्हर्सला सामान शिफ्टिंग साठी बोलावले होते. १५ ऑक्टोबरला कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून अज्ञात व्यक्तीने तिच्या घरातील आठ लाख ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह सामानाची चोरी केली होती. अशीच दुसरी घटना काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी करून पलायन केले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या