भांडुपमधील ड्रीम्स मॉलच्या आगीने रुग्णालयात हाहाकार
मुंबई, दादासाहेब येंधे : भांडुप पश्चिम येथील ड्रीम्स मॉल मध्ये गुरुवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीची झळ सनराईस कोरोना रुग्णालय पर्यंत पोचून आगीच्या धुराने श्वास गुदमरून नऊ जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री १२ वाजता लागलेली ही आग शुक्रवारी रात्री ८ वाजता म्हणजे सुमारे २० तासानंतर विझविण्यात दलाला यश आले आहे.
आगीची वर्दी मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याबरोबरच रुग्णालयात अडकून पडलेल्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन जवान तसेच पोलिसांसह इतर यंत्रणांनी केलेल्या तत्परतेमुळे ६७ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. या दुर्घटनेमुळे मुंबईतील अग्नीसुरक्षा यंत्रणेतील गंभीर त्रुटी पुन्हा उजेडात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस चौकशी होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा