सीएसएमटी स्थानकात पोलिसांची नाकाबंदी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

सीएसएमटी स्थानकात पोलिसांची नाकाबंदी

अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र नसल्यास 

स्थानकात जाण्यास बंदी

मुंबई, दादासाहेब येंधे : वाढत्या कोरोना महामारीला आळा बसावा यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यात केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांनाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र अनेक प्रवाशांकडे अत्यावश्यक सेवेचे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसतानाही ते मुंबईच्या लोकलमधून प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. परिणामी, शुक्रवारपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील 'धन्यवाद गेट'वर लोहमार्ग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रवाशांचे ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कार्डधारकांना, आरोग्याबाबत उपचार घेण्यास आलेल्या प्रवाशांना स्थानकात सोडले जात असून कोणतेही अधिकृत कार्ड नसलेल्या व विनाकारण लोकल ट्रेनचा वापर करणाऱ्या प्रवाशांना लोकलने प्रवास नाकारण्यात येत आहे. त्यामुळे अधिकृत कारण असल्याशिवाय तसेच अत्यावश्यक कर्मचारी असल्याचे आयडी कार्ड असल्याशिवाय कुणीही लोकलने प्रवास करू नये अशी कळकळीची विनंती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी नागरिकांना केली आहे.

*व्हिडिओ👇 बघा...*


सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे ☝श्री. मोहिते प्रवाशांना माईकद्वारे प्रबोधन करीत आहेत. 
 
जीआरपी तसेच होमगार्ड दल प्रवाशांचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे आयडी कार्ड चेक करूनच त्यांना स्थानकात प्रवेश करण्यास अनुमती देत आहेत.👇







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज