मुंबई, दि. २० : आय.डी. बी.आय.वर्क्स युनियन दीपावली निमित्त प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी आज सकाळी १० वाजता रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन आय डी बी आय बँकेचे एम.डी.व सी.ई.ओ.श्री.राकेश शर्मा यांच्या शुभहस्ते बँकेचे डी.एम.डी श्री.जयकुमार पिल्लईजी,श्री.सुमित फक्काजी, कार्यकारी निदेशक श्री.उगेन ताशीजी, श्री.एस. सन्मुगसुंदरम तसेच ऑल इंडिया डी.बी.आय. एम्प्लॉइज असोसिएशन चे महसचिव श्री.रत्नाकर वानखेडे, आय.डी.बी.वर्क्स युनियनचे महासचिव श्री.भीमराव साळवे, उपाध्यक्ष श्री.सीताराम कांबळे, श्री.रमेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री.धर्मपाल सुर्वे, श्री.योगेश पाटील, श्री.सचिन शिंदे,श्री एकनाथ ईश्वलकर, सविता जगताप, सुगंध पवार यांनी अप्रतिम,सुरेख अशा रांगोळी काढून हे रांगोळी प्रदर्शनाकडे सर्वाना पाहण्यासाठी आकर्षित केले.नुकताच मराठवाडा विदर्भ येथे झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवावर आलेले संकट, हाताश झालेला बळीराजा यावर भाष्य करणारी सुरेख अशी रांगोळी योगेश पाटील यांनी रेखाटली.


0 टिप्पण्या