मुंबई, दि. ७ : आधारिका फाऊंडेशन प्रस्तुत जीवन प्रबोधिनी ट्रस्ट आणि नन्ही परी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आज दादर पूर्व येथील सुप्रसिध्द श्रीमती कमला मेहता अंधशाळेत दहीहंडी उत्सवाचे धमाकेदार आयोजन करण्यात आले होते.

छोट्या-छोट्या दिव्यदृष्टी लाभलेल्या मुलींच्या उत्साहाला उधाण आले होते. त्या फेर धरुन दहीहंडीच्या गाण्यावर ताल धरत होत्या. पाण्याच्या फवाऱ्यांत नाचत होत्या. त्यातलाच एक छोटा बाळकृष्ण ही बागडत होता. ज्याला खांद्यावर घेत झकास मनोरे रचले आणि हंडी फोडली. त्यानंतर महेश नावले यांच्या डान्स कराटे अकादमीच्या प्रशिक्षित निर्भया महिला गोविंदा पथकाच्या रणरागिणींनी स्वयंरक्षणाच्या प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकं सादर केली आणि नऊवारी साड्या नेसलेल्या त्या महाकालीस्वरुप कन्यकांनी भरभर मनोरे रचत सलामी दिली.


उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला या प्रसंगी अंधशाळेचे सर्व विश्वस्त जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे अमित पवार (अध्यक्ष), सत्यवान नर, अविनाश पवार, बाजीराव तुपे, गिरीश मकवाना, प्रशांत पवार, संदीप सकपाळ तसेच आधारिका फाऊंडेशनचे श्रीकांत राणे, विनायक मोरे, संतोष मेळेकर, प्रसाद मोरे, केतन वेखंडे, तसेच नन्ही परी फाऊंडेशनचे आसिफ भाई नेहल वाघेला शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा मॅडम सर्व शिक्षक कर्मचारी तसेच स्री उद्योगवर्धिनी मुंबई च्या अध्यक्षा ॲड श्वेता सरवणकर-मॅकवान तसेच विभागातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा