मुंबई, दि. ८ : ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात शिस्तबद्ध नऊ थरांचे कौशल्य दाखवत यंदाही जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवावर आपली छाप पाडली आहे.

दहा थरांचा त्यांचा प्रयत्न यंदाही थोडक्यात हुकला. त्या पाठोपाठ जोगेश्वरीच्या कोकण नगर, बोरवलीच्या शिवसाई मंडळांनी रचलेले नऊ थरांनी लक्ष वेधून घेतले. सरींचा वर्षाव आणि गोविंदांचा उत्साह अशा वातावरणात रात्री उशिरापर्यंत दहीहंडीचा जल्लोष मुंबई ठाण्यात दिसून येत होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा