ड्रग्ज तस्कराच्या भावाला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

demo-image

ड्रग्ज तस्कराच्या भावाला अटक

मुंबई, दि. २७ : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थतस्कर कैलास राजपूत याचा भाऊ कमल राजपूतला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आठ कोटींच्या तस्करी प्रकरणात मंगळवारी अटक केली. मात्र, कैलास हा परार असून त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमलची अटक महत्त्वाची ठरणार आहे.
images


गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने १५ मार्चला अंधेरी परिसरात छापा टाकून १५ किलो ७४० ग्रॅम कॅटामिन व २३ हजाराहून अधिक वायग्राची पाकिटे जप्त केली होती. केटामाईनची आमची किंमत सात कोटी ८७ लाख रुपये तर वायग्राची किंमत ५८ लाख रुपये होती. या प्रकरणात आधी सात जणांना अटक केल्यानंतर या टोळीचा मोहोरक्या कैलास राजपूतसह आणखी तिघांवर लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. या तस्करीत कैलासचा भाऊ कमलचा देखील सहभाग असल्याचे समोर आले होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *