Ticker

6/recent/ticker-posts

नौदलाच्या इंसास रायफल चोरी प्रकरणी तेलंगणातून दोन भावांना अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : कुलाबा, नेव्ही नगर या अतिसुरक्षित परिसरातून इंसास रायफल आणि तीन भरलेल्या मॅगझीन चोरी करणाऱ्या दोघाना तेलंगणा राज्यातील नक्षली भागातून अटक कऱण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोन जणांकडून चोरलेली रायफल आणि दारुगोळा  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले दोघे भाऊ असून त्यातील एक जण कोची येथे नौदलात खलाशी होता अशी माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले दोघे चोरलेली इंसास रायफल ही नक्षलवाद्यांना विकण्याच्या तयारीत होते अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

राकेश दुबला आणि उमेश दुबला असे तेलंगणा येथून अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची नावे असून हे दोघेजण ४ सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. दोन दिवस त्यांनी मुंबई कुलाबा येथील नौदलाच्या आतील रेकी केली होती. अशी माहिती समोर येत आहे. दोघांपैकी एक जण कोची येथे नौदलात खलाशी म्हणून नोकरीला होता.६सप्टेंबर रोजी उमेश हा क्यूआरटीचा गणवेश घालून नेव्ही नगर मध्ये गेला होता. सायंकाळी साडेसात वाजता तो एपी टॉवर्स या प्रतिबंधित परिसरात गेला आणि त्या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या एका जवानांना हाय अलर्ट असल्याचे सांगून त्याच्याकडील इंसास रायफल, ३ मॅगझीन आणि ४० जिवंत काडतुस घेऊन त्याला हॉस्टेल वर जाण्यास सांगितले.

सहा तांसाच्या ड्युटीनंतर रिल्व्हीवर आलेला असेल असे समजून त्या जवानांने आपल्या जवळील रायफल आणि दारुगोळा त्याच्याकडे सुपूर्द केला आणि हॉस्टेल वर निघून गेला होता. अर्ध्या तासाने जवान आपले विसरलेले घड्याळ घेण्यासाठी ड्युटीच्या ठिकाणी आला असता त्या ठिकाणी त्याला क्यूआरटी चा अधिकारी आढळून आला नाही,त्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकिस आला.नयाप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरण गंभीर असल्यामुळे मुंबई गुन्हे शाखा, एटीएस, एनआयए आणि नौदल पोलीस आरोपीच्या शोध घेण्याच्या कामाला लागले होते.


तपास यंत्रणांच्या हाती काही पुरावे आढळून आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक तात्काळ आरोपीचा माग काढत तेलंगणा राज्यात दाखल झाले, तेलंगणा राज्यातील नक्षली भागातून मंगळवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने राकेश आणि उमेश या दोघाना अटक करून त्याच्याजवळून चोरलेली इंसास1 रायफल आणि भरलेल्या मॅगझीन जप्त करण्यात आलेल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे दोघे चोरलेली रायफल नक्षलवादद्याना विकणार होते अशी माहिती समोर येत असून त्या महितीच्या आधारे तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या