मुंबई : रशिया-युक्रेन यांच्या सुरू झालेल्या युद्धाचे पडसाद मुंबई शेअर बाजारावर देखील पडले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स गुरुवारी तब्बल २ हजार अंकांनी कोसळला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीलाही मोठा धक्का बसला आहे. काल गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स तब्बल २७०० अंकांनी कोसळून ५४, ५२९ वर पोहोचला.
तर दुसरीकडे निफ्टी देखील ८१५ अंकांनी घसरून १६,२४७ वर गेला. सेन्सेक्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची चौथी मोठी तर वर्षभरातील दुसरी मोठी पडझड आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा