मुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

मुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई, दि. २५ : राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण केले आहे. परतीच्या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.


मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर शाळकरी मुलांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.


मुंबईला उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज