मुंबई, दि. १५ : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीत ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी मंडळाचे आजी, माजी पदाधिकारी, स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने पत्रकार दादासाहेब येंधे यांना यावेळेस ध्वजारोहणाचा मान दिला.
सदर कार्यक्रमास विश्वस्त भाई मयेकर, अध्यक्ष संतोष सकपाळ, सरचिटणीस गणेश काळे खजिनदार शंकर साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून कार्यक्रमाला शोभा आणली.
मंडळाचे सरचिटणीस, अध्यक्ष व विश्वस्त यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अनिल घाडीगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


0 टिप्पण्या