मुंबई, दादासाहेब येंधे : लालबाग परिसरातील कथानकाची परंपरा लाभलेले प्रसिद्ध जुने मंडळ अशी ख्याती असलेले रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ८५ वे वर्ष असून यंदा मंडळाने आकर्षक असे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा अतिशय सुंदर असा देखावा सादर केला आहे.

राष्ट्रपती पदक विजेचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी आपल्या कल्पकतेने हुबेहूब असे अक्कलकोट गावच जणू उभे केले आहे. तसेच ख्यातनाम मूर्तिकार दिनेश सारंग यांनी १८ फूट उंचीची लंबोदराची अतिशय सुबक उत्कृष्ट अशी आगळीवेगळी मूर्ती साकारली आहे. गणेश भक्त तसेच स्वामी भक्तांसाठी ही एक सुखद पर्वणीच म्हणावी लागेल. मंडळाचे अध्यक्ष संतोष सकपाळ, कार्याध्यक्ष रोहन सावंत, सरचिटणीस गणेश काळे, खजिनदार शंकर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा ८५ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तरी गणेशभक्त व स्वामी भक्तांनी या अक्कलकोट गावचा देखावा बघण्यासाठी मंडळाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या