Ticker

6/recent/ticker-posts

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्याला अटक

मुंबई : पोलीस उपायुक्त परिमंडळ -४ मधील अँटॉप हिल पोलीस ठाणे हद्दीत शस्त्रे बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून बेकायदेशीर दोन अग्निशस्त्रं, ४९ जिवंत काडतुसे व १८ बोअर कारटेजस हस्तगत केली आहेत. १२ ऑगस्टला पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अँटॉप हिल पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीने घरात बेकायदा अग्निशस्त्र बाळगली आहेत, असे समजले असता त्याच्या घरी धाड टाकली. त्यावेळी अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे आढळली. याप्रकरणी सरबजीतसिंह कवलजीतसिंह बजवा यास अटक केली असून त्याला पोलीस कोठडीत ठेवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या