पुरेशा लससाठ्याअभावी १२ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

पुरेशा लससाठ्याअभावी १२ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद

पुरेशा लससाठ्याअभावी १२ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद

मुंबई, दादासाहेब येंधे :  कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२१ तसेच शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ असे दोन दिवस लसीकरण बंद राहणार आहे.

दरम्यान, उद्या दिनांक १२ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे शनिवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण पुन्हा सुरु होईल.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.




( जसंवि/२७५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज