मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विकणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. शहरातील नशेबाजांना विकण्यासाठी आणलेला तब्बल दोन कोटींचा एमडीच्या साठा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने जप्त केला आहे. त्या कारवाईमुळे नशेबाजांचे चांगलीच पंचायत झाली आहे.

शिवडी क्रॉस रोड येथील आदमजी जिवाजी चाळीसमोर दोघे ट्रक माफिया मोठ्या प्रमाणात एमडी चा साठा घेऊन येणार असल्याची माहिती युनिट-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दया नायक तसेच निरीक्षक सचिन पुराणिक, दीपक पवार, सपोनि उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, ड्रग्स माफिया तिथे येताच पथकाने त्यांच्यावर झडप घातली. मात्र, इम्रान शोएब खान हा माफिया पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण, त्याचा साथीदार सलीम हारून रशीद खान हा पोलिसांच्या तावडीत सापडला. शिवडी येथे राहणाऱ्या सलीमची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक हजार २८ ग्रॅम वजनाचे व दोन कोटी चार लाख किमतीचा एमडी चा साठा मिळाला. हा ड्रग्स साठा सलीमने कोठून आणला, तसेच तो कोणाला विकणार होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा