मिर्झापुरातून पोलिसांनी केली अटक
मुंबई, दि. २६ : हत्येच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला काही दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते. मात्र, कारागृहाबाहेर येताच तो मिर्झापूर येथे जाऊन लपला. अखेर त्याला मुंबई गुन्हे शाखेने पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.
जुबेर बशीर अहमद इद्रीसी (वय,३६) असे त्या आरोपीचे नाव असून हत्येच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी जुबेरला अटक केली होती. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या नंतर जुबेरची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान २० जून ते ४ ऑगस्ट २०२० या कालावधीसाठी जुबेरला पॅरोलवर सोडण्यात आले होते. रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जुबेरने पुन्हा कारागृहात दाखल होणे आवश्यक असताना तसे न करता तो फरार झाला होता. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट-५ चे प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक अजित गोंधळी तसेच अविनाश चिलप, सरफरोज मुलाणी व प्रमोद पाटील या पथकाने मिर्जापुर येथे जाऊन जुबेरला पुन्हा पकडून आणले.
0 टिप्पण्या