मुंबई : मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त पुढे गेल्यामुळे त्याची कसर भरून काढण्याचे काम गुरुवारी मान्सूनपूर्व सरींनी केले. मुंबईच्या आकाशात संध्याकाळपासूनच काळ्या ढगांची गर्दी झाली होती. रात्री उशिरा सीएसएमटी येथे रिमझिम तर दादर, वांद्रे, बोरिवली ते दहिसर, अंधेरी, विलेपार्ले, प्रभादेवी, कांदिवली, विक्रोळी, भांडुप, कुर्ला या परिसरांमध्ये दमदार पाऊस झाला. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ मध्ये पावसाने हजेरी लावल्याने मान्सूनची छत्री उघडावी लागली आहे.
व्हिडिओ पहा..👇
(कुर्ला येथे गुरुवारी रात्री ८ वाजता पडलेला पाऊस)
मुंबईमध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाची वर्दी आली आणि रात्री उशिरा प्रत्यक्ष पावसाची बरसात झाली. घामाच्या धारा आणि उन्हाचा तडाख्याला कंटाळलेल्या मुंबईकरांना पावसाने काहीसा दिलासा दिला. वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. उपनगरांमध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या नागरिकांची अचानक झालेल्या बरसातीमुळे तारांबळ उडालेली दिसली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा