अतिवेगवान वाऱ्यामुळे रेल्वेची दाणादाण - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १९ मे, २०२१

अतिवेगवान वाऱ्यामुळे रेल्वेची दाणादाण

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिप्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ओव्हरहेड वायरवर झाड पडणे, पत्रे उडून पडणे, फांद्या पडणे अशा घटना घडल्या. चर्चगेट, मरीन लाईन्स, पालघर, विरार, दहिसर या स्थानकांत ओव्हरहेड वायरवर फांद्या, पत्रे पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरदेखील परिणाम झाला. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकालाही बसला असून, वाऱ्यामुळे लोहमार्ग पोलीस ठाणेसमोरील छतावरील पत्रे उडून गेल्याची घटना सोमवारी घडली. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot