लाटांच्या माऱ्याने धक्क्याचे दगड निखळले
मुंबई : भारताचे प्रवेशद्वार अशी ओळ्ख असलेल्या मुंबईतील अपोलो बंदर भागातील पुरातन वास्तू दर्जा लाभलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया' परिसराचे तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाले. तटबंदी स्वरूपात उभारलेल्या धक्क्यांचे भलेमोठे दगड लाटांच्या माऱ्याने निखळले आणि लांबवर जाऊन पडले. एवढेच नव्हे तर गेट वे ऑफ इंडिया भोवती सुशोभिकीकरणासाठी उभारलेल्या कठड्याचा काही भागही लाटांच्या माऱ्यात निखळून पडला.

0 टिप्पण्या