मुंबई, दि.३० : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून जे काही सत्या संघर्षाचे नाट्य सुरू होते ते अखंड बुधवारी संपले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट समाज माध्यमांवर उपस्थित राहत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी आपले विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणाऱ्या शिवसैनिकांनी अडथळा आणू नये. राज्यात नव्या लोकशाहीचा पाळणा हलणार आहे; तर तो जल्लोषात हलू देत असे सांगत उद्धव यांनी बंडखोर आमदार तसेच भाजपलाही एक प्रकारे टोला लगावला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमत चाचणीचा मुद्दा निकालात निघाला असून आता राज्यपाल हे भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला राज्यात सत्ता स्थापनेसाठी कशाप्रकारे सांगतात हे पाहायला हवे.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राजभवनात जाऊन राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा