गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

थर्टीफर्स्ट निमित्त कडेकोट बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झालेले असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यात सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सुमारे दोन लाखांवर पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. बुधवारपासून सर्वत्र आवश्यकतेनुसार नाकाबंदी लावण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला जाणार असून या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे



लेबल: , , ,

नशाबंदी मंडळाकडून जनजागृती

 



































लेबल: , ,

आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे. आता करदात्यांना १० जानेवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करता येणार आहे. विवरणपत्र दाखल करण्याची मुदत केंद्र सरकारने तिसऱ्यांदा वाढवली  आहे. यापूर्वी ३१ जुलै व ३१ डिसेंबर अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. 

वैयक्तिक कर्जदात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. २८ डिसेंबर पर्यंत साडेचार कोटी नागरिकांनी विवरणपत्र दाखल केले होते. मात्र, अनेकांना विवरणपत्र दाखल करता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ करून देण्यात आली आहे.



लेबल: , , ,

३१ जानेवारीपर्यंत लॉक डाऊन वाढवला

मुंबई, दादासाहेब येंधे : सरत्या वर्षातील तब्बल दहा महिने लॉक डाऊन मध्ये गेले. २०२१ या नव्या वर्षातील जानेवारीचा पहिला महिनासुद्धा लॉक डाऊन मध्येच असणार आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी बुधवारी या बाबतचे परिपत्रक जारी केले आहे. लॉक डाऊनचा कालावधी महिनाभरासाठी वाढवण्यात आला असला तरी पुनश्च हरिओम अंतर्गत लागू करण्यात आलेल्या सवलती कायम असतील. तर प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू असलेले निर्बंध कायम असतील. पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळी गेले आहेत. अशा ठिकाणी निर्बंधाचे पालन करण्याच्या सूचना त्या-त्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.



 


लेबल: , ,

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

व्हायोलिनचे वादन

कोरोनाच्या महामारीने २०२० या वर्षाला वेठीस धरले. आता येणारे २०२१ हे नववर्ष आनंददायी यावे याकरिता इम्रान खान या कलाकार्ने मुंबईकरांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सायकलपटू कलावंताने व्हायोलिनचे वादन करून सर्वांचे लक्ष वेधले. 



लेबल: , , , ,

दिलीप छाब्रियाला पोलीस कोठडी

 प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाला पोलीस कोठडी

मुंबई : डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याला फसवणूकप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता (सीआययू) पथकाने अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी छाब्रिया याची आलिशान कारही जप्त केली आहे.  

सीआययूचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वझे यांना मिळालेल्या माहितीनुसार नरिमन पॉईंट परिसरात बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्ट्स कार येणार होती. त्यानुसार वझे यांनी सापळा लावला होता मात्र; ती कार आलीच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी  हॉटेल ताज परिसरात कार येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वझे यांच्या पथकाने तेथे पुन्हा सापळा लावला. तेथे एक स्पोर्ट्स कार आली असता, पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यामध्ये बनावट नंबर प्लेटस कारचा चेसिस नंबर बदलल्याचेही पोलिसांना आढळले. त्यानुसार पोलिसांनी कार ताब्यात घेत ती बनवणाऱ्या दिलीप छाब्रिया याला अटक केली.




लेबल: , , , ,

सांताक्लॉजने वाटले मास्क

 नाताळ आणि नववर्ष स्वागताचा उत्साह असतानाच मुंबईत सांताक्लॉज मास्क वाटताना दिसत आहे. 







लेबल: , , ,

माहीम दर्गा यात्रेवरही कोरोनाचे सावट

 माहिमचा दर्गा येथील यात्रेवरही यंदा कोरोनाचे सावट आहे. प्रशासनाच्या नियमावलीनुसार साधेपणाने साजरा होत असलेला उरूस. माहीमच्या प्रसिद्ध मखदूम शाह बाबा दर्गा येथे उर्स शरीफमध्ये सहभागी झालेले मुंबई पोलीस. 

 



लेबल: , , , , ,

सिद्धिविनायक मंदिराला कंगना राणावतची भेट

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने काल (मंगळवार) सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मराठमोळ्या वेशात कंगना यावेळी दिसून आली.

 





लेबल: , , ,

वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेसाठी मुदतवाढ

मुंबई : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने वाहन परवाना नोंदणी प्रमाणपत्र, परमिट यासारख्या वाहनविषयक कागदपत्रांची वैधता मुदत covid-19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ३२ मार्च २०१२१ पर्यंत वाढवली आहे. यात १ फेब्रुवारी २०२० किंवा ३१ मार्च २०२१ रोजी वैधता संपणार या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना सामाजिक अंतर राखून वाहतुकीशी संबंधित सेवा मिळवण्यात मदत होणार आहे. मंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व समजून योग्य रीतीने याची अंमलबजावणी करावी. जेणेकरून, कोरोना महामारीच्या काळात नागरिक वाहतूकदार आणि इतर संघटनांना त्रास होणार नाही. अशी विनंती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.





लेबल: , , ,

थर्टी फर्स्ट यंदा घरी साजरा करा

 थर्टी फर्स्ट यंदा घरी साजरा करा

मुंबई, दादासाहेब येंधे :  मुंबईत थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाचे स्वागत दरवर्षी मोठ्या जल्लोषात केले जाते. चौपाट्या भरलेल्या असतात, हॉटेल ओसंडून वाहत असतात. मात्र, यंदाच्या थर्टी फर्स्टला  कोरोनाचे गालबोट लागलेले आहे. मुंबईसह राज्यात कोरोमचं रोगाचा प्रभाव कायम असल्यामुळे यंदा थर्टी फर्स्ट घरीच आणि साधेपणाने साजरी करा, असे आवाहन सरकारने केले आहे. गृह विभागाने सोमवारी राज्यातील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढू नयेत असे यात स्पष्ट केले आहे.  

राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्य महापालिका हद्दीत २२ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच दोन्ही विभागांच्या सूचनांप्रमाणे ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व १० वर्षांखालील मुलांना आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळावे. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिक मोठया प्रमाणात धार्मिक स्थळांत जात असतात. त्या ठिकाणी गर्दी न करता सुरक्षित वावराच्या निकषांचे पालन करावे. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.




लेबल: , , ,

चोख बंदोबस्त

 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांवर मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी चोख बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला आहे. तरीही नववर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नरिमन पॉईंट येथे पोलीस कमांडो गस्त घालून उभे आहेत.



लेबल: , , , ,

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट तर्फे सत्कार

समाजसेवकांच्या कार्याची दखल

मुंबई, दादासाहेब येंधे : बृहन्मुंबई महानगरपालिका 'एल' विभागाच्या करनिर्धारन व संकलन खात्यात कार्यरत असणारे विभाग निरीक्षक श्री.सुहास साळवी यांनी कोरोना काळात केलेल्या फूड पॅकेट वाटप, धान्य वाटप, जोगेश्वरी येथील गरजु लोकांना मदत तसेच इतर उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना जीवनप्रबोधिनी ट्रस्टचे पदाधिकारी सत्यवान नर , अमित पवार, आणि हेमंत मक़वाना यांच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संदेश राणे, सतिश कार्लेकर, स्वप्नील चंडे, आकाश खरात हे उपस्थित होते.



लेबल: , ,

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

साकीनाक्यात आग

मुंबईत काल पहाटे शीव-कोळीवाडा, साकीनाका येथे लाकडाच्या गाळ्याला आग लागली. अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 




लेबल: , , ,

संजय गांधी उद्यानात वाघाला बघण्यासाठी गर्दी

मुंबई, दादासाहेब येंधे  :  चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा वनक्षेत्रात बंदिस्त करण्यात आलेल्या आणि त्यानंतर गोरेवाडा येथे ठेवण्यात आलेल्या आरटी -१ या सात वर्षे वयाच्या नर वाघाला शनिवारी सकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले.  या वाघाने तीन दिवस प्रवास केला. त्याची प्रकृती उत्तम असून सध्या त्याला विलगीकरणात ठेवले आहे. त्यानंतर त्याचे पुढील व्यवस्थापन करण्यात येईल येईल. या वाघाला बघण्यासाठी मुंबईकरांनी रविवारी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. 



लेबल: , , ,

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

माथेरान येथे आगीत कार खाक

सुदैवाने जीवित हानी टळली

पर्यटनासाठी येत असलेल्या एका पर्यटकाच्या कारने माथेरान घाटात अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे घाटात एकच गोंधळ उडाला. या आगीत कार जळून खाक झाली. कारमध्ये पेट्रोल जास्त असल्याने झालेल्या स्फोटात कारचे तुकडे परिसरातील डोंगरावर पडले होते. सुदैवाने, यात जीवितहानी झालेली नाही.

नेरळहून माथेरानकडे येत असलेली एक कार माथेरान पासून ३०० मीटर अंतरावर आली असताना कारमधून अचानक धूर येऊ लागला. काही काळात धुराचे रूपांतर आगीत झाले. प्रसंगावधान राखत कारमधील महिला पुरुष बाहेर पडले. आग वाऱ्यामुळे भडकत होती, यामध्ये कार जळून खाक झाली. घटनास्थळी पोलिस व व्यवस्थापक समितीचे कर्मचारी टॅक्सी-चालक, मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. स्फोटानंतर कारचे तुकडे डोंगरावर पडल्याने डोंगरावरील गवताने पेट घेतला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.




लेबल: , , ,

कांदिवलीतील तिघांचा मृत्यू

 कांदिवलीतील तिघांचा मृत्यू

मुंबई, दादासाहेब येंधे :  कांदिवली पश्चिम-चारकोप परिसरातील साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कांदिवली- पश्चिम चारकोप बंदर पाखडी रोड, गुरव जमुना इमारतीसमोर असलेल्या साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले.  आग पसरल्याने या मंदिरात झोपलेल्यांना तात्काळ बाहेर पडणे शक्य झाले नाही. माध्यरात्र असल्याने आसपासच्या परिसरातील रहिवाशी झोपेत होते. त्यामुळे अग्निशामक दलाला  आगीची माहिती उशिरा मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.




लेबल: , ,

रुक जाना नहीं" या मराठी चरित्राचे उद्घाटन


  

डॉ. भावेश भाटिया यांच्या "रुक जाना नहीं" या  मराठी चरित्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यपाल आदरणीय श्री.  भगवतसिंह जी कोश्यारी यांच्याहस्ते नुकतेच राजभवन, (गव्हर्नर हाऊस) मुंबई येथे पार  पडले. 
यावेळी एनएबी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, इंडिया चे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच अन्य प्रमुख पाहुणे उपस्थित होते.





लेबल: , ,

स्वदेशी वापरा

 स्वदेशी वापरा

देशवासीयांनी नव्या वर्षाचा संकल्प करत आपल्या दैनंदिन वापरासाठी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वावलंबी भारतासाठी जागतिक दर्जाची उत्पादने बनवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यंदा कोरोना संकटातून मिळणारी शिकवण आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार असल्याचे मोदींनी नमूद केले.

आकाशवाणीवर रविवारी यंदाच्या वर्षातील मोदींचा अखेरचा 'मन की बात' हा कार्यक्रम प्रक्षेपित झाला. यावेळी त्यांनी स्वावलंबी भारत मोहिमेला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे नमूद करत 'व्होकल फॉर लोकल' चा मंत्र लोकांनी अंगीकारण्याची सांगितले. लोक आता स्वदेशी वस्तूंची मागणी करत आहेत. दुकानदार देखील भारतीय उत्पादनांना प्राधान्य देत आहेत, त्यामुळे आता आपली उत्पादने जागतिक दर्जाची असावीत याकडे उद्योजकांनी लक्ष देण्याची गरज आहेत. जगात जे सर्वोतम असेल ते भारतात तयार झाले पाहिजे यासाठी उद्योजकांनी स्टार्टर्स ने पुढाकार घ्यायला हवा असे मोदी म्हणाले. आपल्या आयुष्यात आपल्या नकळतपणे अनेक परदेशी वस्तूंनी प्रवेश केला आहे. आपण या वस्तूंची यादी करून त्यांच्या जागी भारतीय उत्पादने खरेदी करू शकतो असे सांगत मोदींनी देशवासीयांना स्वदेशीला प्राधान्य  देण्याचे आवाहन केले. काश्मिरी केसरला जीआय टॅग मिळाल्यानंतर आता केंद्र सरकार या केसरचा जागतिक पातळीवरील ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे केसरची निर्यात वाढून स्वावलंबी भारताच्या प्रयत्नांना हातभार लागेल असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. जगातील इतर देशांमध्ये सिंह वाघ बिबटे यांची संख्या कमी होत असताना भारतात या प्राण्यांची संख्या वाढत आहे याद्वारे भारताने जगाला एक मार्ग दाखवला आहे, असे मोदी म्हणाले.

हिमालयात आणि समुद्र किनाऱ्यांवर कचरा गोळा करणाऱ्या काही लोकांची उदाहरणे देत मोदींनी देशवासीयांना कचरा न करण्याचे आव्हान केले कचरा न करण्याचा संकल्प घेणे हा स्वच्छ भारत मोहिमेचा उद्देश आहे असे मोदीजी यावेळी म्हणाले.



लेबल: , , , , ,

लोकलमध्ये होणार कोरोनाबाबत जनजागृती

  लोकलमध्ये होणार कोरोना जागृती

मुंबई : कोरोना व अन्य आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच  प्लाझ्मादानासाठी कोरोनामुक्तांनी पुढे यावे यासाठी मुंबई महापालिका रेल्वेची मदत घेणार आहे. कोरोना विषयीच्या जाहिराती रेल्वे डब्यांमधून केल्या जाणार असून यासाठी मध्य रेल्वे सोबत डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत चार महिन्यांचा करार करण्यात आला आहे. मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रण आलेला नाही. मात्र, नागरिक कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तसेच संबंधित नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न वापरणारे  अनेकजण दिसतात. तसेच मास्क घातलाच असेल तर तो नाकातोंडाच्या खाली असतो. त्यामुळे पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाई सोबतच पालिकेने जनजागृतीवर ही विशेष भर देण्याचे ठरविले आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माहिती शिक्षण व संपर्क विभागामार्फत मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संदेश जनजागृती करून सातत्याने नागरिकांपर्यंत पोचवण्यात येत असतात. नागरिकांनी काही नियम स्वतः हुन पाळल्यास या आजाराला आळा बसू शकतो. यासाठी लोकलमध्ये जाहिराती करण्यात येणार आहेत. 

लेबल: , , , ,

स्वेटर, मफलर, कानटोपीची खरेदी

स्वेटर, मफलर, कानटोपीची खरेदी

मुंबईत थंडीची चाहूल अधूनमधून येत असल्याने मुंबकरांनी रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून स्वेटर तसेच गरम कपड्यांची खरेदी सुरू केली आहे.



लेबल: , , , ,

मुंबईकरांनी जुहू चौपाटीवर केली गर्दी

 सलग आलेल्या सुट्ट्या आणि नाताळचा आनंद घेण्यासाठी रविवारी मुंबईकरांनी जुहू चौपाटीवर अशी गर्दी केली होती.




लेबल: , , ,

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

नवे वर्ष कोविडमुक्त होवो

नाताळनिमित्त राज्यातील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवानी प्रार्थना केली. येत्या नव्या वर्षात जगाला कोरोनातून मुक्तता मिळावी, अशी भावना सर्वानी व्यक्त केली. 



लेबल: , , ,

कोरोनाचे नियम पाळून चर्चमध्ये प्रार्थना

कोरोनाबाबत सरकारने जाहीर केलेले नियम पाळून चर्चमध्ये येशूची प्रार्थना करण्यात आली. मुंबईमधील बऱ्याचशा चर्चमध्ये गट बनवून प्रार्थना करण्यात आली. नाताळचा सण यांचा कोविड च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत असला तरी उत्साह मात्र दिसून येत होता. 





लेबल: , , , ,

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

बच्चे कंपनीसोत सांता...

ख्रिस्तमसचा उत्साह मुंबईभर दिसून येत आहे. लहान मुलांसोबत सांताक्लॉज मजा करत असून मुलांसोबत फोटो काढण्याचा मोह सांताक्लॉजलाही आवरला नाही... 



लेबल: , , , ,

पार्ट्यांवर अंकुश

 गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम 

मुंबई, दादासाहेब येंधे : नाताळ थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी गर्दी जमवलं तर खबरदार, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. गर्दी करणाऱ्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे नाताळच्या पार्टीसाठी घराबाहेर पडताना मुंबईकरांना वेळेचे भान ठेवावे लागणार आहे. चारपेक्षा अधिक जण एकत्र दिसल्यास कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे. हा नियम धुडकवल्यास सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होईल. 

पहाटेपर्यंत जागे राहणाऱ्या मुंबईत नाताळ,  नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. घराघरांमध्ये, इमारतींच्या गच्चीवर, हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ डिसेंबर पासून १ जानेवारीपर्यंत पार्ट्या सुरू असतात. मात्र, यंदा  कोरोनाच्या संसर्गामुळे या पाट्यांवर निर्बंध आले आहेत. त्यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने सरकार व पालिकेनेही अधिक सतर्कता बाळगली आहे. यातूनच राज्य सरकारने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत एकटे दुकटे घराबाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, पार्ट्यांमध्ये सामाजिक वावर न पाळणे, मास्क न घालण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे हे टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे.








लेबल: , , , , ,

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

सहा महिन्यापूर्वी हरवलेल्या इसमाचा खून झाल्याचे उघड

- दादासाहेब येंधे : आरे पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोउनि खोलम व पथक हे दि. २३/९२/२०२० गुर.क. ६७६/ २०२० कलम ४५४,४५७,३८० भादवि या गुन्हयातील अटक आरोपी नामे मुबारक प्यारेजहांन सय्यद र्फ बाबू, बय २० वर्षे वब अमित सियाराम शर्मा उर्फ बीडी, बय २६ वर्षे याचेकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालमत्तेबाबत चौकशी करीत असतांना, आरोपी नामे मुबारक प्यारेजहांन सय्यद उर्फ बाबू, बय २० वर्षे हा तपास पथकापासून काही तरी लपवत असल्याचा संशय आल्याने, तपास पथकाने त्यास विश्वासात घेवून, त्याचेकडे सखोल तपास केला असता, त्याने सांगितले की, त्यांच्याच परीसरात राहणारा इसम नामे रवि साबदे यास दिनांक २४/०६/२०२० रोजी रात्री ०९.०० वा ते ०२.०० वा. चे सुमारास अदाणी इलेक्ट्रीसिटी समोर,जे.व्ही.एळ रोड, जोगेश्वरी(पू), मुंबई येथे बोलावून,जुन्या भांडणाचा राग मनात धरून वब रविची मैत्रिण नामे माया हिच्या सोबत असलेल्या प्रेमसंबंधावरून रक्नि यास हाताने मारहाण करून, आरोपी नामे बाबू याने त्याचा साथीदार आरोपी नामे अमित सियाराम शर्मा उर्फ बीडी याच्या मदतीने जमिनीवरील दगडाने डोके ठेचून निघृणपणे खून करून, त्याची ओळख पटू नये म्हणून, त्याच्या अंगावरील शर्ट फाडून, त्याच्या पायातील चप्पळ व वापरता मोबाईल ठेचून पाण्यात फेकून, त्याचा मृतदेह नाल्याच्या बाजूला फेकून दिला असल्याचे सांगितले. सदरबाबत पोउनि खोलम यांनी पोलीस 'ठाणेचा अभिलेख तपासला असता, रवि साबदे हरवले बाबत ह.व्यनों.क ३१९/ २०२० तकार नोंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी सदरची माहिती मा.वपोनी पवार मॅडम यांना दिली. वपोनि पवार यांनी सदरची माहिती मा. वरिष्ठांना दिली असता, मा. वरिष्ठांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, पोडनि खोलम यांची फिर्याद घेवून सदर आरोपीविरूध्द गु.र. क. ६९५/२०२० कलम ३०२,२०१,३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अटक आरोपीस मा. न्यायालयाने दिनांक २८/१२/२०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक आरोपीचेनाव:--

१) मुबारक प्यारेजहांन सय्यद उर्फ बाबू, बय २० वर्षे

२) अमित सियाराम शर्मा उर्फ बीडी, बय २६ वर्षे

सदरची कारवाई मा. श्री. दिलीप सावंत सो, अपर पोलीस आयुक्‍त, उ.प्रा.व्रि., मा. डॉ. श्री. डी.एस. स्वामी, पोलीस उप आयुक्‍त सो. परि--१२ यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.आयुक्‍त श्री. सुभाष जाधव सो. दिंडोशी विभाग, वपोनि श्रीमती. नुतन पवार सो, पो.नि. श्री. विनोद पाटील (गुन्हे) आरे पोलीस ठाणे, पोउनि उल्हास खोलम, पो.ना.क्र.  ९६१८८६/वसंत उगले, पो.शि.क्र. ०८.४७७/अंबादास भाबड, पो.शि.क्र. ०६.१६४५/गौतम बडे पोशि.,क्र. ०९. ३३३७/समाधान डांगे, पो.शि.क्र. १९०५९६/बिनल शिंगाणे, जानराव, काटे यांनी या पथकाने अथक परीश्रम घेवून उघडकिस आणला. अशी माहिती आरे पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नुतन पवार यांनी दिली आहे. 







चोरीला गेलेले दागिने हस्तगत

 लग्न समारंभातून चोरीला गेलेले दागिने हस्तगत

ठाणे : लग्न समारंभातून खुर्चीवर ठेवलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी परराज्यातून चोरीला गेले ४२ तोळे सोने हस्तगत केले. 

घोडबंदर रोडवर जलसा लॉनमध्ये अनिता ओमवीर सिंग यांचा मुलगा सचिन यांचा लग्न समारंभ सुरू होता. दरम्यान खुर्चीवर ठेवलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग काही क्षणात चोरीला गेली. त्या बागेत ४२ तोळे सोन्याचे दागिने होते. या चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिस उपायुक्‍त विनायकुमार राठोड, सहाय्यक पोलिस आयुक्‍त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शहादेव पालवे व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. 

हे दागिने मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून बबलू सुमेरसिंग सिसोदिया व त्याच्या दोन साथीदारांनी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस आपल्या शोधात असल्याचा आरोपींना सुगावा लागल्याने ते तेथून पळून गेले. परंतु, चोरीला गेलेले सगळे दागिने नबबलूच्या घरी मिळाले पोलिसांनी ते हस्तगत केले. 



लेबल: , , ,

रेल्वे पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांतर्फे पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन शिबिर 

मुंबई, दादासाहेब येंधे : रेल्वे स्थानकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासह कोरोना नियम  मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर आहे. नुकत्याच लागू झालेल्या संचारबंदीतही पोलिसांना अहोरात्र गस्त घालावी लागत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांतर्फे पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

पोलिसांना कुटुंबीयांसोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. अथक परिश्रमामुळे तणाव वाढतो. अनेक व्याधींचा ही सामना करावा लागतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १८ वरील वेटिंग हॉलमध्ये हे शिबिर आयोजित केले होते. मानसोपचार तज्ञ  खट्टर यांनी यावेळी तणाव कमी करण्यासाठी सोप्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केल्याचे सीएसएमटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. पाल यांनी सांगितले.







लेबल: , , ,

नाताळ साधेपणाने साजरा करा

 नाताळ साधेपणाने साजरा करा - राज्य सरकार

मुंबई, दादासाहेब येंधे : नाताळ सण दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोविड च्या (covid-19) पार्श्वभूमीवर सर्वजण साधेपणाने सण साजरे करत आहे. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांनी देखील नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. 

राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचनाही काढल्या असून त्यानुसार चर्चमध्ये ५० पेक्षा जास्त जणांनी गर्दी करू नये. ३१ डिसेंबरची प्रार्थनाही मध्यरात्री न करता सायंकाळी ७ पूर्वीच करावी. तसेच मिरवणुकांचेही आयोजन करण्यात येऊ नये असेही त्यात म्हटले आहे.

नाताळच्या दिवशी चर्चमध्ये येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री यासारख्या काही वस्तू ठेवल्या जातात, त्या ठिकाणी सामाजिक अंतर राखले जावे. तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. 

चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर केला जावा. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने वा स्टॉल्स लावण्यात येऊ नये. तसेच ६० वर्षांवरील नागरिकांनी व १० वर्षाच्या खालील बालकांनी घरातच सण साजरा करावा. असे राज्य सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.



लेबल: , , ,

मुंबईत शांतता....

 मुंबईमध्ये २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणावर रात्री शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून देखील ठिकाणी ग्रस्त आणि बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.





लेबल: , , , ,

संचारबंदीतही बाहेर फिरण्याची मुभा

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाचा संसर्ग आणि त्यात नाताळ नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवासाठी नागरिक रस्त्यावर येतील या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी असली तरी घराबाहेर पडण्यास उभा आहे. परंतु, गर्दी करू नका, असा सल्ला मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. चारपेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे.

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच हा विषाणू नवीन रूप धारण करत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक एकत्र येतात, त्यातून संसर्ग होण्याचा धोका असल्याने राज्यात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र, यामुळे नोकरदार, सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये संभ्रम आहे. सरकारने लावलेली संचारबंदी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी असल्याचे नांगरे-पाटील यांनी म्हटले आहे.

रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. रात्रपाळीचे कार्यालये वगळता हॉटेल, सिनेमागृह अशी करमणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना रात्री अकरा वाजता बंद करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिक एकटेदुकटे घराबाहेर पडू शकतात. दुचाकी किंवा कारनेही प्रवासही करू शकतात. मात्र, यामध्ये चार पेक्षा अधिक व्यक्ती नको असे त्यांनी म्हटले आहे.




लेबल: , , , , ,

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट उपाय

"स्मार्ट सहेली" मार्फत महिला प्रवाशांमध्ये आरपीएफची जनजागृती

मुंबई, दादासाहेब येंधे :  रेल्वे प्रवासात महिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी स्मार्ट ही लिहा उपक्रम मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा दलाने हाती घेतला आहे या अंतर्गत ८५ व्हाट्सअप ग्रुप निर्माण करून सात हजार आठशे एक सहलींच्या माध्यमातून मध्य रेल्वेवरील सर्व लोकल फळांमधील महिलांना सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत सेक्टर सहेली, स्टेशन सहेली, ट्रेन सहेली असे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येतील. प्रत्येक ग्रुप मध्ये प्रशिक्षित आरपीएफ महिला कर्मचारी, नियमित प्रवास करणाऱ्या महिला यांचा समावेश असेल. या सर्व व्हॉट्सअप ग्रुपची देखरेख विशेष देखरेख पथकातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येईल. यापूर्वी सुरू असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मधून मर्यादित लोकल फेऱ्यांमध्ये सुरक्षा पुरवणे शक्य होते हे टाळण्यासाठी स्मार्ट सहेली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात सध्या पाच हजार सहेलींचा- महिला प्रवाशांचा समावेश करण्यात आला आहे, असे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनी सांगितले.




लेबल: , , , ,

दिव्यांगांच्या डब्यात सीसीटीव्ही

घुसखोरी गुन्हेगारीला बसणार आळा 

मुंबई : लोकलमधील दिव्यांगांच्या डब्यात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे दिव्यांगांच्या डब्यातील घुसखोरी रोखणे आणि डब्यातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होईल. एलफिस्टन पादचारी पूल दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक बोलावली होती. यात मुंबई लोकलमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. "इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये" (आयसीएफ) बांधणी करण्यात आलेल्या तीन लोकल आणि सीमेन्स बनावटीची एक अशा एकूण चार लोकलमधील दिव्यांगांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

लेबल: , , , , ,

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

व्हाट्सअप बघत असताना मोबाईल लांबवला

लोकल ट्रेनमध्ये मोबाईल सांभाळा -लोहमार्ग पोलीस

मुंबई :  ट्रेनमध्ये बसलेले असताना व्हाट्सअप वरील मेसेज चेक करताना एका चोरट्याने झडप घालून हातातला मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकारम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे अशोक खांडके हे आपली ड्युटी संपवून घरी परतत होते. खांडके यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकातून पनवेलला जाणारी लोकल ट्रेन पकडली होती. लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असल्याने गाडीमध्ये मोजकेच प्रवासी होते. खांडके दरवाजाजवळ असलेल्या आसनावर बसले होते. प्रवासात टाईमपास म्हणून ते व्हाट्सअपवर आलेले मेसेज वाचत असताना रात्री अकराच्या सुमारास ही लोकल मशिद बंदर स्थानकात पोहोचली. 

अचानक एका इसमाने खांडके यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत धावत्या लोकलमधून उडी मारत पळ काढला. त्या चोराचा पाठलाग करण्यासाठी लोकलमधून उतरणार तितक्यात लोकल सुरू झाली. खांडके यांनी याप्रकरणी सीएसएमटी  लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.



लेबल: , , , , , ,

भायखळा स्थानकाला १८५७ चा लूक

मध्य रेल्वेमार्गावरील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या भायखळा स्थानकाचा येत्या नवीन वर्षात कायापालट होणार आहे. या स्थानकाला १८५७ चा लुक देण्यात येत आहे. येत्या २६ जानेवारी रोजी स्थानकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामध्ये स्थानकातील नक्षी, दरवाजे, खिडक्या, भिंतीचा समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली जाणार आहे. 

भायखळा हे मेन लाईन वरील गर्दीचे स्थानक आहे. भायखळा स्थानकाच्या पश्चिमेकडे २६ कमानी आहेत. या कमानीवरील फुलांवर सुंदर आणि रेखीव असे नक्षीकाम केले आहे. हे नक्षीकाम पुन्हा जिवंत करण्यात येत आहे. तसेच स्थानकाच्या बाहेरील भिंती स्वच्छ करण्यात आल्या आहेत.  

छतावरील जुनी कौले काढून त्याजागी साजेशी अशी कौले लावण्यात येणार आहेत. जुन्या तिकीट खिडकीच्या आतील भागातील दुरुस्तीचे काम सुरू आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दुरुस्ती करण्यात आली आहे. 

देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांमध्ये भायखळा स्थानकाचा समावेश आहे. १८५३ साली या स्थानकाचे बांधणी लाकडाचा वापर करून केली. त्यानंतर १८५७ साली पुन्हा नव्याने बांधकाम केले तेच बांधकाम आजही पहावयास आपल्याला मिळत आहे.



लेबल: , , , ,

नेरुळ रुग्णालयाच्या अचानक भेटीतून आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांची रुग्णालयीन सुविधांची पाहणी

 नेरुळ रुग्णालयाच्या अचानक भेटीतून आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांची रुग्णालयीन सुविधांची पाहणी

-दादासाहेब येंधे :   

सध्या माता बाल रुग्णालय म्हणून कार्यान्वित असणा-या नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारती या सर्वसाधारण रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने प्रशस्त स्वरुपात बांधण्यात आल्या असून त्याठिकाणी १ जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरु करण्याचे लक्ष्य महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नजरसमोर ठेवले आहे.

त्यादृष्टीने संबंधितांना यापूर्वीच दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याची पाहणी करण्यासाठी तसेच रुग्णालयाच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ऐरोली व वाशी रुग्णालयांपाठोपाठ सेक्टर- १५ नेरुळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयास अचानक भेट दिली.

या भेटीदरम्यान सध्या सुरु असलेल्या आरोग्य सेवांची पहाणी करत असताना तेथे सुरू असलेल्या बाह्यरूग्ण सेवांमध्ये (O.P.D.) नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा तपासणी, त्वचाविकार, मानसोपचार, मेडिसीन या बाह्यरुग्ण सेवाही सुरु करण्याची गरज लक्षात घेऊन आयुक्तांनी 1 जानेवारीपर्यंत या बाह्यरुग्ण सेवाही सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुर्तता करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.

ऐरोली प्रमाणेच नेरुळ रुग्णालयातही कोव्हीड पश्चात उपचारकेंद्र (Post COVID Clinic)  सुरु असून त्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्दी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या कोव्हीड बाधीत  होणा-यांची संख्या कमी झाली असली तरी कोव्हीड बाधीत होऊन गेल्यानंतर वैद्यकीय सेवेची गरज असणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा नागरिकांसाठी महानगरपालिकेची उपचार सेवा रूग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता दर्शनी भागात फलक लावणे तसेच विविध माध्यमांचा उपयोग करण्याचे निर्देश आयुक्तांनी  दिले.

याशिवाय नेरुळ रुग्णालयात डायलिसीस सेवा उपलब्ध असून तेथील ५ युनिट्सचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याचीही प्रसिध्दी व्यापक स्वरुपात करावी असे आयुक्तांनी सूचित केले.

या पाहणी दौ-यात फायर एक्स्टिंग्युशर या काही अग्निशमन उपकरणांच्या वापर कालावधीची मुदत उलटून गेल्याचे निदर्शनास आल्याने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशित केले.

रुग्णालयात पुरेशी स्वच्छता आहे मात्र त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याच्या व तेथे नागरिक मोठ्या प्रमाणात येत असल्याने प्रामुख्याने स्वच्छता गृहांच्या नियमित स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

बालरोग वॉर्डमध्ये दाखल होणारी रुग्णसंख्या सध्या कमी दिसत असून त्याबाबतही अधिक चांगल्या रुग्णसेवेवर भर देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूमच्या सद्यस्थितीबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधितांना समज देण्यात आली तसेच १५ दिवसात अभिलेख अधिनियमानुसार रेकॉर्ड रूम अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले.

पूर्ण क्षमतेने स्टरलायझेशनच्या खरेदी करण्यात आलेल्या मोठ्या मशीन्स विनावापर पडून असल्याने त्यांचा वापर विनाविलंब सुरू करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले.


रूग्णालयामध्ये १ जानेवारीला पुरुष व  महिलांसाठी प्रत्येकी १५ बेड्सचे मेडिकल वॉर्ड व १० बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरु करण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिक्षकांची असेल असे पुन्हा एकवार स्पष्ट करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पुढच्या टप्प्यात १ फेब्रुवारी पासून सर्जिकल वॉर्ड व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरु करण्याचेही नियोजन असल्याचे स्पष्ट केले.








लेबल: , , ,