लोकलमध्ये होणार कोरोना जागृती
मुंबई : कोरोना व अन्य आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच प्लाझ्मादानासाठी कोरोनामुक्तांनी पुढे यावे यासाठी मुंबई महापालिका रेल्वेची मदत घेणार आहे. कोरोना विषयीच्या जाहिराती रेल्वे डब्यांमधून केल्या जाणार असून यासाठी मध्य रेल्वे सोबत डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत चार महिन्यांचा करार करण्यात आला आहे. मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रण आलेला नाही. मात्र, नागरिक कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तसेच संबंधित नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न वापरणारे अनेकजण दिसतात. तसेच मास्क घातलाच असेल तर तो नाकातोंडाच्या खाली असतो. त्यामुळे पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाई सोबतच पालिकेने जनजागृतीवर ही विशेष भर देण्याचे ठरविले आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माहिती शिक्षण व संपर्क विभागामार्फत मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संदेश जनजागृती करून सातत्याने नागरिकांपर्यंत पोचवण्यात येत असतात. नागरिकांनी काही नियम स्वतः हुन पाळल्यास या आजाराला आळा बसू शकतो. यासाठी लोकलमध्ये जाहिराती करण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या