Ticker

6/recent/ticker-posts

पार्ट्यांवर अंकुश

 गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम 

मुंबई, दादासाहेब येंधे : नाताळ थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी गर्दी जमवलं तर खबरदार, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. गर्दी करणाऱ्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे नाताळच्या पार्टीसाठी घराबाहेर पडताना मुंबईकरांना वेळेचे भान ठेवावे लागणार आहे. चारपेक्षा अधिक जण एकत्र दिसल्यास कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे. हा नियम धुडकवल्यास सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होईल. 

पहाटेपर्यंत जागे राहणाऱ्या मुंबईत नाताळ,  नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. घराघरांमध्ये, इमारतींच्या गच्चीवर, हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ डिसेंबर पासून १ जानेवारीपर्यंत पार्ट्या सुरू असतात. मात्र, यंदा  कोरोनाच्या संसर्गामुळे या पाट्यांवर निर्बंध आले आहेत. त्यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने सरकार व पालिकेनेही अधिक सतर्कता बाळगली आहे. यातूनच राज्य सरकारने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत एकटे दुकटे घराबाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, पार्ट्यांमध्ये सामाजिक वावर न पाळणे, मास्क न घालण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे हे टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या