कांदिवलीतील तिघांचा मृत्यू
मुंबई, दादासाहेब येंधे : कांदिवली पश्चिम-चारकोप परिसरातील साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागून
झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
कांदिवली- पश्चिम चारकोप बंदर पाखडी रोड, गुरव जमुना इमारतीसमोर असलेल्या साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री
साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आग पसरल्याने या मंदिरात झोपलेल्यांना तात्काळ बाहेर
पडणे शक्य झाले नाही. माध्यरात्र
असल्याने आसपासच्या परिसरातील रहिवाशी झोपेत होते.
त्यामुळे अग्निशामक दलाला आगीची माहिती उशिरा मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या भीषण आगीत तीन जणांचा
मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून स्थानिक
पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
0 टिप्पण्या