छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांतर्फे पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन शिबिर
मुंबई, दादासाहेब येंधे : रेल्वे स्थानकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासह कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर आहे. नुकत्याच लागू झालेल्या संचारबंदीतही पोलिसांना अहोरात्र गस्त घालावी लागत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांतर्फे पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पोलिसांना कुटुंबीयांसोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. अथक परिश्रमामुळे तणाव वाढतो. अनेक व्याधींचा ही सामना करावा लागतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १८ वरील वेटिंग हॉलमध्ये हे शिबिर आयोजित केले होते. मानसोपचार तज्ञ खट्टर यांनी यावेळी तणाव कमी करण्यासाठी सोप्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केल्याचे सीएसएमटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. पाल यांनी सांगितले.



0 टिप्पण्या