Ticker

6/recent/ticker-posts

स्वदेशी वापरा

 स्वदेशी वापरा

देशवासीयांनी नव्या वर्षाचा संकल्प करत आपल्या दैनंदिन वापरासाठी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वावलंबी भारतासाठी जागतिक दर्जाची उत्पादने बनवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यंदा कोरोना संकटातून मिळणारी शिकवण आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार असल्याचे मोदींनी नमूद केले.

आकाशवाणीवर रविवारी यंदाच्या वर्षातील मोदींचा अखेरचा 'मन की बात' हा कार्यक्रम प्रक्षेपित झाला. यावेळी त्यांनी स्वावलंबी भारत मोहिमेला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे नमूद करत 'व्होकल फॉर लोकल' चा मंत्र लोकांनी अंगीकारण्याची सांगितले. लोक आता स्वदेशी वस्तूंची मागणी करत आहेत. दुकानदार देखील भारतीय उत्पादनांना प्राधान्य देत आहेत, त्यामुळे आता आपली उत्पादने जागतिक दर्जाची असावीत याकडे उद्योजकांनी लक्ष देण्याची गरज आहेत. जगात जे सर्वोतम असेल ते भारतात तयार झाले पाहिजे यासाठी उद्योजकांनी स्टार्टर्स ने पुढाकार घ्यायला हवा असे मोदी म्हणाले. आपल्या आयुष्यात आपल्या नकळतपणे अनेक परदेशी वस्तूंनी प्रवेश केला आहे. आपण या वस्तूंची यादी करून त्यांच्या जागी भारतीय उत्पादने खरेदी करू शकतो असे सांगत मोदींनी देशवासीयांना स्वदेशीला प्राधान्य  देण्याचे आवाहन केले. काश्मिरी केसरला जीआय टॅग मिळाल्यानंतर आता केंद्र सरकार या केसरचा जागतिक पातळीवरील ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे केसरची निर्यात वाढून स्वावलंबी भारताच्या प्रयत्नांना हातभार लागेल असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. जगातील इतर देशांमध्ये सिंह वाघ बिबटे यांची संख्या कमी होत असताना भारतात या प्राण्यांची संख्या वाढत आहे याद्वारे भारताने जगाला एक मार्ग दाखवला आहे, असे मोदी म्हणाले.

हिमालयात आणि समुद्र किनाऱ्यांवर कचरा गोळा करणाऱ्या काही लोकांची उदाहरणे देत मोदींनी देशवासीयांना कचरा न करण्याचे आव्हान केले कचरा न करण्याचा संकल्प घेणे हा स्वच्छ भारत मोहिमेचा उद्देश आहे असे मोदीजी यावेळी म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या