Ticker

6/recent/ticker-posts

माथेरान येथे आगीत कार खाक

सुदैवाने जीवित हानी टळली

पर्यटनासाठी येत असलेल्या एका पर्यटकाच्या कारने माथेरान घाटात अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे घाटात एकच गोंधळ उडाला. या आगीत कार जळून खाक झाली. कारमध्ये पेट्रोल जास्त असल्याने झालेल्या स्फोटात कारचे तुकडे परिसरातील डोंगरावर पडले होते. सुदैवाने, यात जीवितहानी झालेली नाही.

नेरळहून माथेरानकडे येत असलेली एक कार माथेरान पासून ३०० मीटर अंतरावर आली असताना कारमधून अचानक धूर येऊ लागला. काही काळात धुराचे रूपांतर आगीत झाले. प्रसंगावधान राखत कारमधील महिला पुरुष बाहेर पडले. आग वाऱ्यामुळे भडकत होती, यामध्ये कार जळून खाक झाली. घटनास्थळी पोलिस व व्यवस्थापक समितीचे कर्मचारी टॅक्सी-चालक, मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. स्फोटानंतर कारचे तुकडे डोंगरावर पडल्याने डोंगरावरील गवताने पेट घेतला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या