नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झालेले असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यात सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सुमारे दोन लाखांवर पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. बुधवारपासून सर्वत्र आवश्यकतेनुसार नाकाबंदी लावण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला जाणार असून या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

0 टिप्पण्या