प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाला पोलीस कोठडी
मुंबई : डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याला फसवणूकप्रकरणी
मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता
(सीआययू) पथकाने अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी छाब्रिया याची आलिशान कारही जप्त केली आहे.
सीआययूचे सहाय्यक
पोलिस निरीक्षक सचिन वझे यांना मिळालेल्या माहितीनुसार नरिमन पॉईंट परिसरात बनावट
नंबर प्लेट असलेली स्पोर्ट्स कार येणार होती.
त्यानुसार वझे यांनी सापळा लावला होता मात्र; ती
कार आलीच नाही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी
हॉटेल ताज परिसरात कार येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वझे यांच्या पथकाने
तेथे पुन्हा सापळा लावला. तेथे एक स्पोर्ट्स कार आली असता, पोलिसांनी त्याची तपासणी
केली. त्यामध्ये बनावट नंबर प्लेटसह कारचा चेसिस नंबर बदलल्याचेही पोलिसांना आढळले. त्यानुसार पोलिसांनी कार ताब्यात घेत ती बनवणाऱ्या दिलीप छाब्रिया
याला अटक केली.

0 टिप्पण्या