तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात जनजीवन ठप्प
मुंबई : समुद्र किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने काल सोमवारी रौद्ररूप धारण केल्याने मुंबई, ठाणेसह, कोकणची पार दाणादाण उडवली. बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी सखल भाग असल्यामुळे पाणी साचले होते. मुंबई लोकलच्या ओव्हरहेड वायरवर झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. तर अनेक स्थानकांचे पत्रे उडाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा