रेल्वेने पनवेल - गोरखपूर विशेष ट्रेनच्या वेळेत बदल
तपशिला खाली दिल्यानुसार:
05066 विशेष आता दि. १०.३.२०२१ ते ६.४.२०२१ पर्यंत पनवेल येथून दर सोमवारी, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी १५.५० वाजता (१७.५० ऐवजी) सुटेल आणि गोरखपूरला तिसर्या दिवशी ००.२० वाजता (०४.३० वाजताच्या ऐवजी) पोहोचेल.
05065 विशेष* दि. ९.३.२०२१ ते ५.४.२०२१ पर्यंत गोरखपूर येथून दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व रविवारी ०५.३० वाजता (त्याच वेळेस) सुटेल व पनवेलला दुसर्या दिवशी १४.५० वाजता (त्याच वेळेस) पोहोचेल.
थांबे आणि संरचना यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
प्रवाशांना विनंती आहे की वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.
विशेष गाड्यांच्या थांब्याच्या विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
--- --- ---
दिनांक: ८ मार्च २०२१
प्रप क्रमांक 2021/03/12
सदर प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा